
नांदणी सहकारी बँकेतर्फे तज्ञ संचालकांची निवड
04981
विद्यासागर बस्तवाडे
04982
ॲड. जयकुमार पोमाजे
04980
दिलीप चौगुले
नांदणी सहकारी बँकेतर्फे
तज्ञ संचालकांची निवड
जयसिंगपूर, ता. १ : नांदणी (ता. शिरोळ) येथील नांदणी सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाकडून नुकतेच बँकेच्या तज्ञ संचालकपदी सी. ए. विद्यासागर बस्तवाडे (जयसिंगपूर) व ॲड. जयकुमार पोमाजे (कुरुंदवाड) यांची निवड करण्यात आली. या वेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या धोरणानुसार बँकेस बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी नियुक्त करावे लागते. त्यानुसार विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना त्यात सामावून घेत असताना बँकेच्या संचालक मंडळाने बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी गठीत केली. या कमिटीच्या अध्यक्षपदी दिलीप श्रीकांत चौगुले (जयसिंगपूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडी संचालक मंडळाच्या मासिक सभेत करण्यात आल्या. या वेळी सभेचे अध्यक्षस्थानी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे होते. बँकेचे उपाध्यक्ष रमेश भुजुगडे व संचालक मंडळ उपस्थित होते. सर्व नियुक्त मान्यवरांचा सत्कार आप्पासाहेब लठ्ठे यांच्या हस्ते झाला. नांदणीचे सुपुत्र व बँकेचे सदस्य प्रगतशील शेतकरी रघुनाथ म्हेत्रे यांची डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेचे सीईओ आर. पी. कसलकर यांनी स्वागत केले. नवनिर्वाचित संचालक मंडळ व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटी सदस्यांना बँकेच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. या वेळी सर्व सदस्यांकडून निवड झालेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. सिनिअर ऑफिसर रुस्तुम मुजावर यांनी आभार
मानले.