जयसिंगपूरचा १३३ कोटीचा अर्थसंकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरचा १३३ कोटीचा अर्थसंकल्प
जयसिंगपूरचा १३३ कोटीचा अर्थसंकल्प

जयसिंगपूरचा १३३ कोटीचा अर्थसंकल्प

sakal_logo
By

जयसिंगपूरचा १३३ कोटींचा अर्थसंकल्प
अनेक कामे प्रस्तावित; करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा
जयसिंगपूर, ता. १ : येथील नगरपरिषदेचा सन २०२३-२४ या वर्षासाठीचा १३३ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांनी मंजूर केला. शहराच्या विकासासाठी चालू वर्षात २६ कोटी १६ लाखांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. शिवाय ३४ कोटी पाच लाखांचा निधी मंजूर झाला असून यात अनेक कामे प्रस्तावित आहेत. शिवाय चालू २०२३-२४ सालासाठी उच्चांकी असा १३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाला असल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी माहिती मुलाणी यांनी दिली. विशेषत: या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पालिकेकडे सन २०२२-२३ मध्ये आरंभीची शिल्लक रक्कम ४३ कोटी ३३ लाख ७३ हजार ६३० रुपये, महसुली जमा २३ कोटी ७४ लाख ९२ हजार ८०० रुपये, भांडवली जमा ५७ कोटी ३० लाख ९४ हजार ६०० रुपये असे एकूण जमा १२४ कोटी ४९ लाख ६१ हजार ३० रुपये, तर महसुली खर्च २५ कोटी ४ लाख ९८ हजार ७५५ रुपये, भांडवली खर्च ५८ कोटी ९१ लाख ८५ हजार ९५० रुपये, अखेरची शिल्लक ४० कोटी ४२ लाख ७६ हजार ३२५ रुपये, एकूण खर्च १२ कोटी ४९ लाख ६१ हजार ३० रुपये असा आहे.
पालिकेकडे सन २०२३-२४ यासाठी आरंभीची शिल्लक रक्कम ४० कोटी ४२ लाख ७६ हजार ३२५ रुपये, महसुली जमा २६ कोटी १४ लाख ५६ हजार ८० रुपये, भांडवली जमा ६७ कोटी २४ लाख ६८ हजार २०० रुपये, एकूण जमा १३३ कोटी ८२ लाख ६५० रुपये, तर महसुली खर्च २७ कोटी ८२ लाख ९७ हजार ९७१ रुपये, भांडवली खर्च ७२ कोटी ३० लाख ५२ हजार ४१५ रुपये, अखेरची शिल्लक ३३ कोटी ६८ लाख ५० हजार २२० रुपये, एकूण खर्च १३३ कोटी ८२ लाख ६५५ रुपये,
तर नगरपरिषद महसुली जमामध्ये २६ कोटी १४ लाख ५६ हजार ८० रुपये आहे.
यात करातून पाच कोटी ३२ लाख ४० हजार, पाणीपट्टी कर एक कोटी ८१ लाख ५० हजार, घनकचरा व्यवस्थापक शुल्क ३३ लाख २७ हजार ५०० रुपये, पालिका सहाय्यक अनुदान नऊ कोटी ५२ लाख ६० हजार, सातवा वेतन आयोग फरक दोन कोटी ६६ लाख, विकास शुल्क ५५ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महसुली जमामध्ये महिला व बालकल्याण, दिव्यांग व अपंग कल्याण, आर्थिक दुर्बल घटक प्रत्येकी सात लाख याप्रमाणे २१ लाख रुपये अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात शहरात १३३ कोटी रुपयांची विकासकामे व विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
-----------------
चौकट
असे आहे पालिकेचे नियोजन
विशेष रस्ता अनुदान योजना पाच कोटी, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना पाच कोटी, आमदार निधी योजना ५० लाख, खासदार निधी योजना ५० लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान १० कोटी, अल्पसंख्याक अनुदान ५० लाख, नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर योजना) २.५० कोटी, दलितेतर योजना ५० लाख, अग्निसुरक्षा अभियान योजना १० लाख, १५ वा वित्त आयोग योजना ४.५० कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजना विशेष अनुदान (ठोक) २० कोटी.