शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षा
शिक्षा

शिक्षा

sakal_logo
By

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षा

जयसिंगपूर : रफिक अहमद डांगे (वय ५०) यांनी निष्काळजीपणे एसटी चालवून मोटारसायकलस्वार संभाजी शंकर खोत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ८ महिने कैद व १५०० रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा १ महिना कैद अशी शिक्षा जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आनंद करभाजन यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले. १७ फेब्रुवारी २०२० रोजी एसटी चालक रफिक डांगे हा कुरुंदवाडहून शिरोळकडे येत होता. ट्रॅक्टरला भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना एसटीने मोटारसायकलस्वार संभाजी शंकर खोत (वय ६०, रा. राजापूर, ता. शिरोळ) यांना चुकीच्या दिशेला जाऊन धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर जयसिंगपूर येथील फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.