कोरवी, कैकाडी समाजाचा १९ रोजी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरवी, कैकाडी समाजाचा १९ रोजी मेळावा
कोरवी, कैकाडी समाजाचा १९ रोजी मेळावा

कोरवी, कैकाडी समाजाचा १९ रोजी मेळावा

sakal_logo
By

‘कोरवी, कैकाडी’चा
१९ रोजी मेळावा
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघ प्रणित कोल्हापूर जिल्हा युवक कैकाडी समाज संघातर्फे इचलकरंजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी (ता. १९) जिल्हास्तरीय कोरवी, कैकाडी समाज मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती, कोल्हापूर जिल्हा युवक कैकाडी समाज संघाचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी दिली. ते म्हणाले, ‘मेळाव्यात कैकाडी समाजाचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय बंधन हटवण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणारे राज्य कैकाडी समाज संघाचे राज्याध्यक्ष लालासाहेब जाधव, कल्याण पश्चिम विधानसभेचे कैकाडी समाजाचे पहिले आमदार नरेंद्र पवार, टायगर ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पै. तानाजी जाधव, कोल्हापूर येथील मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, उपविभागीय पोलिस अधिकारी रघुनाथराव जाधव, राज्य उपाध्यक्ष हणमंत माने, राज्य सचिव जयशंकर माने आदी उपस्थित राहणार आहेत.’