‘मगदूम अभियांत्रिकी’चे नांदणीमध्ये शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मगदूम अभियांत्रिकी’चे नांदणीमध्ये शिबीर
‘मगदूम अभियांत्रिकी’चे नांदणीमध्ये शिबीर

‘मगदूम अभियांत्रिकी’चे नांदणीमध्ये शिबीर

sakal_logo
By

‘मगदूम अभियांत्रिकी’चे नांदणीमध्ये शिबिर
जयसिंगपूर, ता. १३ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिर नांदणी (ता. शिरोळ) येथे झाले.
नांदणी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. डीन स्टुडंट्स, प्रा. पी. पी. पाटील, एनएसएस कार्यक्रमाधिकारी, प्रा. पी. ए. चौगुले, डॉ. ए. एम. मोरे, प्रा. आर.डी. माने, प्रा. व्ही. ए. पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी मल्लिकार्जुन बिराजदार उपस्थित होते. सात दिवसांच्या शिबिरात नांदणी गावातील स्वच्छता, माझी वसुंधरा अभियान, प्लास्टिकमुक्त अभियान, वेगवेगळे सर्वेक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, पथनाट्य, बेटी बचाव-बेटी पढाओ, रस्ता सुरक्षा अभियान, योगासने, जनजागृती फेरी, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षगणना आदी कार्यक्रम झाले.
ग्रामस्थांसाठी प्रबोधनपर व्याख्याने झाली. यात प्राजक्ता पाटील यांनी यशस्वी जीवनाचा राजमार्ग, डॉ. आनंद कुलकर्णी यांनी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, भास्कर शिंदे यांनी आनंदी शेती, श्रीमती नीलम माणगावे यांनी मी निर्भया, मोहन जगताप यांनी निसर्गोपचार एक समग्र आयुर्विज्ञान यावर व्याख्यान दिले. सात दिवसांच्या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नांदणी ग्रामस्थांसाठी मोफत इ- श्रम कार्ड, आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, १३० रुपयांमध्ये पॅनकार्ड असे समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले होते. शिबिरात ३०० लोकांनी सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी प्लास्टिकमुक्त गाव, मतदार जनजागृती, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर पथनाट्ये साजरी केली.
शिबिराच्या समारोपास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, नांदणीचे उपसरपंच अजय कारंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा ॲड. सोनाली मगदूम, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, डीन स्टुडंट्स प्रा. पी. पी. पाटील, विनायक चव्हाण यांचे सहकार्य लाभले.