
आरोपी ताब्यात
05034
फोटो-कंसराव आडे
....
ऊसतोड मजूर खूनप्रकरणी संशयितास अटक
जयसिंगपूर: कोथळी (ता. शिरोळ) येथे हनुमंत लाला जाधव (वय ५५, सध्या रा. कोथळी, मुळ गाव धर्माळा, ता.केज, जि.बीड) या ऊसतोड मजुराचा मंगळवारी (ता.७) खून झाला होता. या खून प्रकरणातील संशयित आरोपी कंसराव तुकाराम आडे (वय ३३, रा.वाघोरा, ता.माजलगाव, जि.बीड) हा घटनेपासून फरारी झाला होता. त्याच्या शोधासाठी जयसिंगपूर पोलिसांनी चार पथके तैनात केली होती. अखेर शुक्रवारी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी आडे याला मिरज बसस्थानकात जेरबंद केले. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस कॉन्स्टेबल अमोल अवघडे आणि विजय पाटील यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.