मंगळवारी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवारी कार्यशाळा
मंगळवारी कार्यशाळा

मंगळवारी कार्यशाळा

sakal_logo
By

घोडावत विद्यापीठात उद्या कार्यशाळा

जयसिंगपूर: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार, एम. एस.एम.ई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद आणि संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता सेलचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी दिली. मंगळवारी (ता.१५) सकाळी ११ ते ५ या वेळेत ही कार्यशाळा होईल. सुशिक्षित बेरोजगार, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयीन विद्यार्थी, एमबीए, बीबीए, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री व नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छिणारे सर्व युवक- युवती कार्यशाळेत सहभाग घेऊ शकतात. सहभागी होणाऱ्या सर्वांना एम. एस.एम.ई.चे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यशाळेत एम.एस.एम.ई चे तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून जास्तीत जास्त युवक- युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्यवस्थापन विभागाच्या डीन डॉ. योगेश्वरी गिरी यांनी केले आहे.