
अपघातात दोन ठार
05050, 05051
...
बस-दुचाकी अपघातात
दोघे तरुण जागीच ठार
जयसिंगपूर येथील घटना, दोघेही मृत इचलकरंजीचे
जयसिंगपूर, ता.१३ : येथील क्रांती चौकात आज रात्री नऊच्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन विभागाची एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात इचलकरंजीचे दोन तरुण जागीच ठार झाले. अवधूत जगन्नाथ आवळे (वय १८, रा. राजवाडा चौक, इचलकरंजी) व प्रतीक रवींद्र गस्ते (वय १९, रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सायंकाळी आवळे व गस्ते हे दोघेजण मोटारसायकलवरून सांगलीहून इचलकरंजीच्या दिशेने येत होते. यावेळी कर्नाटक आगाराची एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, जयसिंगपूर येथील क्रांती चौकाच्या पुढे असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर बस व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. यात अवधूत आवळे जागीच ठार झाला, तर प्रतीक गस्तेला उपचारासाठी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातामुळे क्रांती चौकात बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, घटनास्थळी मृतांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
....
चौकट