बौद्ध समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बौद्ध समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे
बौद्ध समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे

बौद्ध समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे

sakal_logo
By

05056
जयसिंगपूर : आंदोलनाला डॉ. यशकश्पायन यांनी पाठिंबा दिला.
-----------
बौद्ध समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे
डॉ. यशकश्पायन; जयसिंगपूर येथील साखळी उपोषणास पाठिंबा
जयसिंगपूर, ता. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा क्रांती चौकातील जुन्या कोर्टातील जिल्हा न्यायालयाच्या जागेत बसवण्याची मागणी अतिशय योग्य आहे. त्यामुळे समस्त राज्यातील बौद्ध समाजाने या मागणीसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बौद्ध धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू जयसिंगपूर बौद्ध संस्कार मंडळाचे प्रभारी डॉ. यशकश्पायन यांनी केले.
जयसिंगपूर येथील जुन्या कोर्टाच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष व संघटना यांच्याकडून पाचव्या दिवशी साखळी उपोषण सुरूच आहे. यावेळी डॉ. यशकश्पायन बोलत होते. आपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे आदींनी आंदोलनास पाठिंबा देऊन पुतळा जुन्या कोर्टाच्या जागेतच झाला पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बजरंग खामकर, रमेश शिंदे, कैलाश काळे, श्रीपती सावंत, आदम मुजावर, रावसाहेब निर्मळे, सुनील कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.