Sat, June 3, 2023

एस.टी. चालकावर गुन्हा
एस.टी. चालकावर गुन्हा
Published on : 14 March 2023, 1:28 am
अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
जयसिंगपूर : शहरातील क्रांती चौकात एसटी व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात अवधूत जगन्नाथ आवळे (वय १८, रा.राजवाडा चौक इचलकरंजी) व प्रतिक रविंद्र गस्ते (वय १९, रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) हे दोघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली होती. या अपघातप्रकरणी जव्हर्गी आगाराचे एसटी चालक लिंगराज कृष्णा सोनार (वय ४३, रा. कलबुर्गी) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिकेत शिवाजी आवळे (रा. इचलकरंजी) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.