बी.आय.डी.एफ.च्या माध्यमातून विकास साधणार-घोडावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बी.आय.डी.एफ.च्या माध्यमातून विकास साधणार-घोडावत
बी.आय.डी.एफ.च्या माध्यमातून विकास साधणार-घोडावत

बी.आय.डी.एफ.च्या माध्यमातून विकास साधणार-घोडावत

sakal_logo
By

05062

कोल्हापूर, सांगलीतील पायाभूत
सुविधांसाठी पाठपुरावा करणार

संजय घोडावत; ‘बीआयडीएफ’तर्फे मेंबरशिप डेव्हलपमेंट

जयसिंगपूर, ता. १५ : बिझनेस अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी एकसंध कटिबद्ध राहू. दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांसह उद्योग आणि उद्योजकांच्या समस्यांसह पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही ‘बीआयडीएफ’चे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांनी दिली.
बिझनेस अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फोरम (बीआयडीएफ) यांच्यावतीने मेंबरशिप डेव्हलपमेंट कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्ष संजय घोडावत यांनी सांगली-कोल्हापूर परिसराचा औद्योगिक विकास फोरमच्या माध्यमातून करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उपाध्यक्ष, उद्योगपती अण्णासाहेब चकोते आणि दीडशे व्यापारी, व्यावसायिक उपस्थित होते. सचिव महेंद्र परमार यांनी स्वागत केले. खजिनदार महेश सारडा यांनी बीआयडीएफचे सभासद होण्याचे फायदे सांगितले. रोटरी इंटरनॅशनलचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय घोडावत यांचा तर चकोते ग्रुपच्या नवीन प्लांटचे उद्घाटन झाल्याबद्दल अण्णासाहेब चकोते यांचा सत्कार झाला. जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन संचालकपदी फेरनिवड झाल्याबद्दल महेंद्र परमार यांचाही सत्कार झाला.
याप्रसंगी घोडावत यांनी भागात चांगले रस्ते व पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. इलेक्ट्रॉनिक डिरेक्टरी व ॲपचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. चकोते यांनी बीआयडीएफची स्थापना, हेतू, उद्दिष्टाची माहिती दिली.
आभार मानताना कार्यकारी सचिव विनायक भोसले यांनी बीआयडीएफची चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी शाहू इंडस्ट्रियल इस्टेट, अकिवाटे इंडस्ट्रियल इस्टेट आणि जयसिंगपूर परिसरातील उद्योजक व संचालक अरुणभाई शहा, राजेश शहा, राजीव पारीख, प्रकाश मेहता, युवराज शहा, अमोद कुलकर्णी उपस्थित होते.