Tue, June 6, 2023

श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा
श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा
Published on : 16 March 2023, 5:04 am
जयसिंगपूरला २३ ला स्वामी समर्थ जयंती
जयसिंगपूर : येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्रातर्फे गुरुवारी (ता. २३) स्वामी समर्थ जयंती सोहळा होणार आहे. पहाटे पाच वाजता अभिषेक, सकाळी आठ वाजता भूपाळी, आरती नऊ वाजता श्री स्वामी याग, साडेदहा वाजता नैवेद्य आरती, अकरा वाजता मांदियाळी (महाप्रसाद), दुपारी साडेतीन वाजता पालखी (नगरप्रदक्षिणा), सायंकाळी साडेपाच वाजता गल्ली क्रमांक चार येथे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व स्वामी समर्थ महाराजांची श्री हरिहर भेट होईल. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री स्वामी समर्थ गो-सेवा संस्था यांनी केले आहे.