जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा आजपासून

जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा आजपासून

05081
जयसिंगपूर : येथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पाळणे उभारण्यात आले आहे.
-------------
जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा आजपासून
जयसिंगपूर, ता. २० : येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उद्या (ता. २१) पासून सुरू होत आहे. मंगळवारी सकाळी श्रींचा अभिषेक व महापूजा, सायकांळी पाच वाजता पालखी मिरवणूक सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यात्रेचे नियोजन श्री सिद्धेश्वर देवालय ट्रस्ट, हमाल गाडीवन मजदूर संघ, गुमास्त संघटना व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सहकार्यातून केले आहे.
महाप्रसाद व पालखी सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, गुरुदत्तचे चेअमरन माधवराव घाटगे, दत्तचे चेअमरन गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, संजय पाटील यड्रावकर, डीवायएसपी रामेश्वर वैजाने, मुख्यधिकारी तैमूर मुलाणी, सपोनि रणजित पाटील आदींच्या हस्ते होणार आहे. बुधवारी मोटारसायकलबरोबरच म्हैस पळवणे स्पर्धा असणार आहे. गुरुवारी श्री सिद्धेश्वर व श्री स्वामी समर्थ महाराज हरिहर भेट, त्याचबरोबर रात्री श्री गुड्डापूर दानम्मा देवी हे कन्नड नाटक आहे. त्याचबरोबर गाडीमागून श्वान स्पर्धा असून शुक्रवारी रात्री ऑर्केस्ट्रा धमाका, शनिवारी रात्री आपली संस्कृती हा लोककलेचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात पाळणे, खेळणी व विविध वस्तूंचे स्टॉल उभारले आहेत. श्री सिद्धेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली आहे. त्याचबरोबर यात्रेनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com