जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू
जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू

जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू

sakal_logo
By

05091
जयसिंगपूर : ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर देवाच्या पालखी मिरवणुकीचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

जयसिंगपूरला सिद्धेश्वर यात्रा सुरू
मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळा; सहा दिवस कार्यक्रम

जयसिंगपूर, ता.२१ : येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस पालखी सोहळ्याने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
पालखीचे पूजन आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याहस्ते झाले. दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्ष व विश्वस्त अमरसिंह निकम, मणी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, देवालय ट्रस्टचे शामराव बंडगर यांच्यासह विश्वस्त,भाविक उपस्थित होते.
प्रारंभी सकाळी ''श्रीं'' चा अभिषेक करण्यात आला. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन आणि सामुदायिक आरती झाली. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. गल्ली क्रमांक चार येथील मंदिरापासून हर हर महादेव, श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात ढोल, ताशा, बँजो, बँड पथक, हलगी लेझीमच्या निनादात आणि फटाक्यांच्या अतषबाजीत पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखी मार्गावर शहरातील सुवासिनीनी पाणी घालून औक्षण केले. ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त सहा दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
देवालय ट्रस्टचे संभाजी मोरे, राजेंद्र शहापुरे, गजानन आंबेकर अमरसिंह निकम, राजेंद्र दांईगडे, रमेश देशपांडे, संजय कुलकर्णी, बबन हतळगे, माजी नगरसेवक बजरंग खामकर, गजाधर मानधना आदी उपस्थित होते. सायंकाळी सात वाजता मंदिर प्रांगणात महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी नगरप्रदक्षिणा करून मंदिर प्रांगणात आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले.