बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान

बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान

बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान
जयसिंगपूर, ता.२१: शिरोळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या जयसिंगपूर बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात आता हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवाय या निवडणुका तब्बल सात वर्षांनी होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोनदा जाहिर झालेला कार्यक्रम रद्द केला होता. त्यानंतर नूतन निवडून आलेल्या ग्रा.प. सदस्यांना संधी मिळाल्यानंतर नव्याने मतदार याद्या केल्या आहेत. यासाठी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नामनिर्देशन दाखल करण्यासाठी २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुदत आहे. ५ एप्रिलपर्यंत छाननी, ६ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी तर ६ एप्रिल ते २० एप्रिल अखेर माघारीसाठी मुदत आहे. त्यानंतर २१ एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप आणि २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर मतदानानंतर ३ दिवसांच्या आत मतमोजणी होणार आहे.
------------
निवडणूक १८ जागांसाठी
जयसिंगपूर बाजार समितीत २८ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीचे ६६८ सदस्य, २५३ सेवा सोसायट्याचे १९२० संचालक, अडते व व्यापारी प्रतिनिधी ३५६ तर हमाल व तोलाई ८७ असे ३ हजार २१ मतदार आहेत. बाजार समितीसाठी विकास सेवा सोसायट्यातून ११ जागा निवडून द्यायच्या असून यात ७ सर्वसाधारण, २ महिला, १ भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती, १ ओबीसी. तर ग्रामपंचायतीतून ४ जागा निवडून द्यायच्या असून यात २ सर्वसाधारण, १ अर्थिक दुर्बल, १ अनुसुचित जाती. अडते व व्यापारी प्रतिनिधी २ जागा तर तोलाई व हमाल १ अशा १८ जागासाठी निवडणुक होणार आहे. तर पुर्वी १९ जागा होत्या. यातील सहकारी व्यापारी मतदार रद्द झाल्याने आता होणारी निवडणुक ही १८ जागेसाठी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com