अकिवाटे औद्योगिक वसाहतीस पाईपद्वारे गॅस

अकिवाटे औद्योगिक वसाहतीस पाईपद्वारे गॅस

05095
उदगाव : ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस पाईप जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
----------
अकिवाटे औद्योगिक वसाहतीस पाईपद्वारे गॅस
१३५ कंपन्यांना पुरवठा; कारखान्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न
जयसिंगपूर, ता. २२ : वसाहतीमधील विविध कारखान्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्‍या सर्व कंपन्यांमध्ये पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे खर्च कमी होवून प्रदूषण कमी करण्याचा औद्योगिक वसाहतींचा प्रयत्न आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरात सध्या पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जात आहे. अशाच पद्धतीने ही गॅसची पाईपलाईन शिरोळ तालुक्यातही टाकली आहे. मजले खिंड ते चौंडेश्वरी सुतगिरणीपर्यंत गॅस पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. चौंडेश्वरी ते ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत उदगावपर्यंत पाईपचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्वप्रथम उदगाव येथील अकिवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाईपद्वारे गॅस देण्यात येणार आहे.
औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांमध्ये लाकडे, दगडी कोळसा, लाईट, गॅस टाक्या या इंधनावर काम चालत आहे. लाकडे व दगडी कोळशाच्या धुरामुळे प्रदुषणात भर पडते. त्यामुळे प्रदुषणमुक्त होण्यासाठी एचपी गॅसच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात प्रथमच उदगाव अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील १३५ कंपन्यांना या पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार आहे.
टाकीतील गॅस सरासरी ७८ ते ८० रुपये प्रतिकिलोने मिळतो. तोच या पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस ५८ रुपये प्रतिकिलो मिळणार आहे. त्यामुळे उदगाव औद्योगिक वसाहतीमध्ये डीआरएस उभारण्यात येणार आहे. यातून सर्व कंपन्या व अन्य गावेही जोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी येथे पाईपद्वारे गॅस मिळत आहे. त्यानंतर आता सर्वप्रथम उदगाव, जयसिंगपूर परिसरात पाईपद्वारे गॅस मिळणार आहे.
....

उदगाव ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाईपद्वारे कंपन्यांना गॅस मिळणार आहे. त्यामुळे गॅस खर्चात बचत होणार आहे. शिवाय औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणही थांबणार आहे. कंपनीकडून पाईप जोडण्यासाठी काम सुरू आहे. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील १३५ कंपन्यांना सर्वप्रथम गॅस जोडण्यात येणार आहे.

-ए. आर. मुल्ला, व्यवस्थापक, ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com