Tue, May 30, 2023

वीस गुंठ्यात साडेआठ क्विंटल हरभरा
वीस गुंठ्यात साडेआठ क्विंटल हरभरा
Published on : 24 March 2023, 12:48 pm
वीस गुंठ्यात साडेआठ क्विंटल हरभरा
जयसिंगपूर : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील आण्णासो तायाप्पा दुधाळे यांनी वीस गुंठे हरभरा पिकाचे साडेआठ क्विंटल विक्रमी उत्पादन घेतले. पावणे चार महिन्यात वीस गुंठयातुन ३८ हजार रुपये मिळवले. नोव्हेंबरमध्ये निडवा ऊस पीक घालवून त्यात रोटर मारून सरी सोडली. दोन्ही बाजूस हरभरा पिकाची टोकन डिसेंबरमध्ये केली. पाण्याच्या दोन पाळ्या दिल्या. एक कीटकनाशकाची फवारणी केली. विशेष म्हणजे या पिकास कोणत्याही स्वरूपाचे रासायनिक खत टाकले नाही. मार्चमध्ये हरभरा पिकाची मळणी होऊन वीस गुंठे जमिनीतून साडेआठ क्विंटल हरभरा निघाला. त्यास प्रति क्विंटल साडेचार हजार भाव लागल्याने ३८ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. याकामी मुलगा बाबुराव तर सून सुनीता यांचे परिश्रम कामी आले.