फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करा

फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करा

05125
मुंबई: फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक रजनी शेठ यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले.
--------
फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करा
माजी खासदार राजू शेट्टी; पोलिस महासंचालक रजनी सेठ यांच्याशी चर्चा
जयसिंगपूर, ता. २९: राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजारहून अधिक मुकादमांकडून दोन वर्षात ४४६ कोटींची आर्थिक फसवणूक केलेली आहे. दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोट्यावधींचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात येत आहे. यामुळे फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर तातडीने कारवाई करून त्यांना शोधण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र पोलिस पथक नेमावी अशी मागणी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनी सेठ यांच्याकडे केली.
ऊसाचा गळीत हंगाम सुरू होत असताना दरवर्षी ऊस तोडणी करण्यासाठी एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देण्यासाठी १० ते १५ लाखांचा अॅडव्हान्स मुकादमाकाकडून घेतला जात आहे. अनेक मुकादम एका टोळीसाठी तीन ते चार वाहनधारकांकडून अॅडव्हान्स घेऊन एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देतात. उर्वरित वाहनधारकांची अॅडव्हान्स घेऊन फसवणूक करतात. राज्यात हजारो वाहनधारक या फसवणुकीचे बळी पडले असून अनेक वाहनधारक यामुळे आत्महत्या करू लागले आहेत. वाहनधारकांच्यावतीने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र संबंधित मुकादमावर कोणतीही कारवाई केलेली नाही. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून राज्यातील ऊस वाहतूकदार आर्थिक संकाटात सापडू लागला आहे.
तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस प्रमुखांना सुचना दिल्या. दरम्यान जेथे गुन्हे नोंद झालेले आहेत त्या मुकादमांना शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश दिले. स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा, प्रविण शेट्टी, शिवाजी पाटील, रावसाहेब अबदान, आनंदा फराकटे, युवराज माळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com