‘घोडावत’च्या विद्यार्थ्यांनी दिले आळते ग्रामस्थांना अर्थकारणाचे धडे

‘घोडावत’च्या विद्यार्थ्यांनी दिले आळते ग्रामस्थांना अर्थकारणाचे धडे

05127
आळते : संजय घोडावत विद्यापीठातील एमबीए द्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी आळते गावाला भेट देऊन अर्थकारणाचे धडे दिले.
-----------
‘घोडावत’च्या विद्यार्थ्यांनी दिले
आळते ग्रामस्थांना अर्थकारणाचे धडे
जयसिंगपूर, ता. २८: संजय घोडावत विद्यापीठातील एमबीए द्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थ प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आळते (ता. हातकणंगले) येथील गावकऱ्यांना अर्थकारणाचे धडे दिले.
सरपंच अजिंक्य इंगवले, डॉ. रेवती देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आर्थिक नियोजन म्हणजे काय? ते कसे करतात? का आणि कशासाठी करतात? त्याचे फायदे काय? याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर लघु नाटिकेच्या सादरीकरणाद्वारे शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
यासाठी एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी संवाद मोहीम राबवली. अशाप्रकारच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळते. तसेच पुस्तकी ज्ञानाचे परिवर्तन प्रात्यक्षिक शिक्षणातून केल्यामुळे वास्तविक कार्पोरेट जगामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी करण्यास मदत होते. कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com