ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्यास प्रतिसाद

ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्यास प्रतिसाद

05136
जयसिंगपूर : आनंद मेळाव्यात अंजुमन खान यांनी मार्गदर्शन केले. व्यासपिठावर मान्यवर उपस्थित होते.
----------
ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्यास प्रतिसाद
जयसिंगपूर, ता.२९ : येथील ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीतर्फे आयोजित आनंद मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या माध्यमातून वृद्धांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपायांबाबत विविध व्यक्तींनी उहापोह केला.
माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन केले. ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आबासाहेब सूर्यवंशी यांच्या ''खरा तो एकची धर्म'' या प्रार्थनेने मेळाव्याची सुरुवात झाली. तालुकाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब क्वाणे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्रमुख वक्ते कुंडल कॉलेजचे प्राध्यापक गणेश उर्फ ऋषिकेश खारगे यांनी पुणेरी स्वागताचे गमतीदार किस्से सांगत पूर्वीचा पाहुणचार आता राहिला नाही याबद्दल खंत व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यकर्ते अंजुमन खान यांनी वृद्धांना शासनाकडून कोणत्या सवलती मिळतात व भविष्यकाळात कोणत्या सवलती फेसकॉमने मागितल्या आहेत याबाबत विवेचन केले. हरी निवृत्ती जगताप यांनी संभाजीपूर व जयसिंगपूर या दोन्ही ठिकाणी विरंगुळा केंद्राची मागणी केली. संघटक सचिव बी. बी. गुरव यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सचिव डी. आर. खामकर यांनी जेष्ठांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे उदाहरणांसह स्पष्ट केले. शशिकला चौधरी यांच्या आभाराने पहिल्या सत्राची सांगता झाली.
दुसऱ्या सत्रात डॉ. राजेंद्र कुंभार यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब काटकर यांनी स्वागत केले. ए. एस. ऐनापुरे यांनी प्रास्ताविक केले. बी. बी. गुरव यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. अध्यक्षीय भाषणात प्रा. अण्णासाहेब क्वाणे यांनी ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या. अनिल जाधव यांनी आभार मानले. माणिक घुमाई, सविता मगदूम, भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दत्तवाड येथील चंद्रशेखर कलगी यांचा ऑर्केस्ट्रा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com