
घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा
घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा
जयसिंगपूर, ता. ५ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलिटेक्निकमध्ये पालक मेळावा झाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सत्कार केला.
प्राचार्य, गिरी पालकांना कॉलेजविषयी माहिती देऊन कॉलेजमधील विविध सुविधा आणि नवीन योजना याबाबत मार्गदर्शन करून तंत्र शिक्षण मंडळाचे नियमांची त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. पालकांचा आपल्या पाल्यांच्या यशामध्ये कसा वाटा असतो हे सह उदाहरण देऊन स्पष्ट केले.
प्राचार्य विराट गिरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. पी. एम. पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख शुभांगी महाडिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख रवींद्र धोंगडी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. पी. एम. पाटील यांनी केले. पालकांना अकॅडमी कॅलेंडरची माहिती देऊन परीक्षेचे नियोजन आणि अभ्यास पद्धतीतील निवडक मुद्द्यावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले.