आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाढदिवस
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाढदिवस

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाढदिवस

sakal_logo
By

05362
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा वाढदिन विविध उपक्रमांनी

जयसिंगपूर, ता. ५ : माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस आरोग्य शिबिरासह विविध उपक्रमांनी साजरा झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी आमदार यड्रावकर यांनी पार्वती को-ऑपरेटिव्‍ह इंडस्ट्रियल इस्टेटमधील स्व. शामरावआण्णा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री संजय बनसोड, माजी मंत्री दत्तामामा भरणे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आयपीएस अधिकारी विकास खरगे, केएलइचे प्रभाकर कोरे, राजू लाटकर, शिवसेनेचे संजय पवार, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, रजनीताई मगदूम, तृप्ती देसाई, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरसह आजी-माजी मंत्री, खासदार, आमदारांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
आमदार राजू आवळे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार के. पी. पाटील, राहुल आवाडे, अशोकराव माने, प्रकाश सातपुते, शामराव कुलकर्णी, नानासो गाट, मदन कारंडे, ए. वाय. पाटील, विरेंद्र मंडलिक यांच्यासह सर्जेराव शिंदे, अनिलराव यादव, संजय कांबळे रणजीत कदम, ॲड. प्रमोद पाटील, दरगू गावडे, महादेव राजमाने आदींनीही शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त नयनतारा ऑप्टिकल्सच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर झाले. आगरमध्ये १५ कोटी खर्चाच्या मागासवर्गीय मुलींसाठींच्या वसतिगृह बांधकामाची पायाभरणी झाली. शिरोळला पद्माराजे हायस्कूल परिसरातील जय भवानी तरुण मंडळाचा चौक सुशोभीकरणाचा पायाभरणी झाली. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांनी राजर्षी शाहू स्टेडियमवर जयसिंगपूर प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. तसेच कोथळीत कोथळी व्हॉलीबॉल प्रीमियर लीग आमदार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले.