राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

05367
जयसिंगपूर: राजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनप्रसंगी पदाधिकारी व नागरीक.

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
जयसिंगपूर : शहर व परीसरात राजर्षी शाहु महाराज यांच्या १०१ व्या स्मृतीदिनानिमित्त जयसिंगपूर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी १०० सेकंद स्तब्ध राहुन आदरांजली वाहिली. येथील क्रांती चौकातील राजर्षी शाहु महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याला शहरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. शाहुनगर येथील आम्ही शाहुनगरकर या ग्रुपतर्फे १०० सेकंद स्तब्ध राहुन आदरांजली वाहिली. शंकर नाळे, शैलेश आडके, अ‍ॅड. धनजंय दळवी, बंडू उरुणकर आदी उपस्थित होते. दरम्यान तमदलगे (ता.शिरोळ) येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सूत गिरणीचे अध्यक्ष, दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर होते. डॉ. माने आणि अनिल कांबळे यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला. १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली. संचालक चिंतामणी निर्मळ, नानासाहेब राजमाने, जितेंद्र चोकाककर, प्रभारी कार्यलक्षी संचालक दिलीप काळे आदी उपस्थित होते.
---------
कुरुंदवाड परिसर
कुरुंदवाड ः शहर व परिसरात शहरात राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व साजरा केला. पालिका चौक, शाहूराजे चौक, पालिका सभागृहासह शाळा, महाविद्यालय, बँका, सहकारी संस्थामध्ये शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले. पालिका प्रशासनाने स्तब्धतेसाठी प्रारंभी १० सेकंद भोंगा वाजवला. १०० सेकंदानंतर भोंगा वाजवून अभिवादन केले. चौकात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना कार्यालय, सकल मराठा कार्यालय, मराठा समाज मध्यवर्ती कार्यालय, मुस्लिम सेंट्रल कमिटी, अबू-हुरैरा मदरसा, शाहूराज विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, मुस्लिम जमाअत सामाजिक संस्था, बिरदेव मंदिर भैरववाडी, दयावान तालीम मंडळ, शाहू पतसंस्था, शेतात काम करणारे शेतमजूर आणि यंत्रमाग व्यावसायिक आणि कामगारांनी यंत्रमाग बंद ठेवत राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून १०० सेकंद स्तब्धता पाळली. आदरांजली वाहिली.
----------------------
शहा विद्यामंदिर
कुंभोज ः बाहुबली येथील एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ झाला. मुख्‍याध्‍यापक गोमटेश बेडगे अध्‍यक्षस्‍थानी होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन केले. शाहू महाराजांच्या कार्याविषयी अध्यापक विनोद मगदूम, पिया धाडवे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी निकाल वाचन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप केले. दहा वाजता उपस्थितांनी शंभर सेकंद मौन पाळून छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.
--------------------
कष्टकरी महिलांकडून अभिवादन
कबनूर ः येथील धुळुसे मळ्यातील ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी सकाळी दहा वाजता काम थांबवून शंभर सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले. शैलजा मगदूम, आनंदी पाटील, राजश्री माने, हैदरा लुकडे, शोभा पाटील, संगीता दंडवते आदी कष्टकरी महिलांचा समावेश होता.
-------------------
हातकणंगले परीसर
हातकणंगले ः राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांना पुण्यतिथीनिमीत्त हातकणंगले परीसरात विवीध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये अभिवादन केले. हातकणंगले येथील मध्यवर्ती चौकात हातकणंगलेच्या तहसिलदार कल्पना ढवळे, नायब तहसिलदार दिगंबर सानप यांच्या उपस्थितीत सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवरांकडून १०० सेकंद स्तंब्ध राहुन अभिवादन केले. ग्रामीण भागातही अभिवादन केले. शेतमजुर महिलांनी शेतातच १०० सेकंद स्तंब्ध राहुन लोकराजाला अभिवादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com