पाऊस

पाऊस

05379
जयसिंगपूर: जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.
....

जयसिंगपुरात विजांच्या कडकडाटासह वळीव

जयसिंगपूर, ता.७: शहरात रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. गटारी ओव्हरफ्लो होऊन पावसाचे पाणी सखल भागात साचून राहिले. काही भागात तर फुटभर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीची गैरसोय झाली. आठवड्याभरापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिला. आठवडा बाजारात पावसामुळे भाजी विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली.
पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही ठिकाणी विद्युतवाहिन्या तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. कर्मचाऱ्यां‍कडून रात्री उशिरापर्यंत विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यां‍च्या भाजीपाल्याचे, वीटभट्टी व्यवसायकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे रस्त्यातील सकल भागात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या आठवड्याभरात उष्णतेचे तीव्रता वाढली होती. दोन वेळा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला होता. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होवून विजेच्या कडकडाटसह वारा सुटला. यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील बऱ्या‍च रस्त्यांवर सकल भागात पाणी साचून राहिले होते. पडलेल्या पावसामुळे गटारी-नाले प्रवाहित झाले. शहरातील काही भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूकदारांना, पादचाऱ्यां‍ना ये-जा करण्यासाठी गैरसोयचे बनले होते. अर्जुनवाडसह परिसरात केवळ वादळी वाऱ्याने विद्युत खांब कोसळले रात्री उशिरापर्यंत वीज खंडित करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com