जयसिंगपूरला नालेसफाई युद्धपातळीवर

जयसिंगपूरला नालेसफाई युद्धपातळीवर

05389
जयसिंगपूर : येथील नगरपालिकेतर्फे नालेसफाई सुरू केली आहे.

जयसिंगपूरला नालेसफाई युद्धपातळीवर
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; सहा पथकांची निर्मिती
जयसिंगपूर, ता. १० : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळीपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जयसिंगपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी सहा स्वतंत्र पथके निर्माण केली आहेत. यात बारा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या बांधीव नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. शहरात १४ बांधीव नाले असून, लक्ष्मी रोड, लक्ष्मी पार्क मागील बाजू, यड्रावकर कॉलनी, शामनगर, अवचितनगर, संभाजीनगर, पेंढारी ते दत्त मंदिर, कोल्हापूर रोड नटराज हॉटेल ते गारे ब्रदर्स, कोल्हापूर रोडवरील त्रिमूर्ती हॉटेल ते झेली चित्रमंदिर या नाल्यांची साफसफाई अंतिम टप्प्यात आहे. कच्च्या नाल्यांची साफसफाई जेसीबी मशिनद्वारे केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com