अपघात

अपघात

05400
...

जयसिंगपुरात ट्रकच्या धडकेत
मोटारसायकलस्वार जागीच ठार

जयसिंगपूर, ता.१०: शहरातील रेल्वे स्टेशनजवळ सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात केशव भीमा तिवडे (वय ५८ रा. चर्चजवळ, उमळवाड, ता. शिरोळ) हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरारी झाला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रशांत रावसाहेब तिवडे (रा. उमळवाड) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
रेल्वे स्टेशनवर सिमेंट काँक्रिट मिक्सरचा ट्रक रिव्हर्स घेत असताना निष्काळजीपणाने वाहन चालवून केशव तिवडे यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने तिवडे हे जागीच ठार झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com