Sat, Sept 23, 2023

हाणामारी
हाणामारी
Published on : 11 May 2023, 6:32 am
तमदलगेत हाणामारी
जयसिंगपूर, ता.११: कुत्र्याने कोंबडी मारल्याच्या कारणातून तमदलगे (ता.शिरोळ) येथे काठी व हाताने हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (ता.१०) सायंकाळी घडली. याप्रकरणी भूपाल धनपाल पाटील, सुरेखा भूपाल पाटील, सम्मेद भूपाल पाटील, दर्शन भूपाल पाटील (सर्व रा.पाझर तलावा शेजारी तमदलगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद जखमी रवींद्र वसंत शिंदे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली.