‘घोडावत’मधील कॅम्पसमध्ये ३५० जणांची नियुक्ती

‘घोडावत’मधील कॅम्पसमध्ये ३५० जणांची नियुक्ती

05422
अतिग्रे : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांचे स्वागत प्राचार्य विराट गिरी यांनी केले.
-------------
‘घोडावत’मधील कॅम्पसमध्ये ३५० जणांची नियुक्ती
जयसिंगपूर, ता. १५ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत आयटीआय येथे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केला. यात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कंपनीने ३५० विद्यार्थ्यांना इंटरशिप व जॉबसाठी नियुक्ती केली.  
दरवर्षी संजय घोडावत आयटीआयमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड, पुणे प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात कंपनीच्या शाखा आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात कंपनीने नावलौकिक प्राप्त केला आहे.
नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडीसाठी आयटीआयचे प्रा. स्वप्निल थिकणे, अविनाश पाटील यांचे सहकार्य लाभले. याबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com