चार चाकीने घेतला पेट
05426
जयसिंगपूर: पेट्रोल पंपावर पेट घेतलेली चारचाकी.
...
जयसिंगपुरात पंपावर इंधन
भरताना चारचाकीने घेतला पेट
आगीत गाडी जाळून खाक, सुदैवाने जिवित हानी टळली
जयसिंगपूर, ता.१५: कोल्हापूर- सांगली महामार्गावर पेट्रोल पंपावर इंधन भरताना अचानक चारचाकी गाडीने पेट घेतला. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. आगीत गाडी जाळून खाक झाली. सुदैवाने जिवित हानी टळली. जयसिंगपूर अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. पंपावरील कर्मचाऱ्यांनाही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकल्याने जयसिंगपूर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन आग नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी घबराट पसरली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.