
उदगावमधील जोगेश्वरी यात्रा आजपासून
05434
श्री जोगेश्वरी देवी
------
उदगावमधील जोगेश्वरी यात्रा आजपासून
धार्मिक, सांस्कृतिक, कुस्तीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
जयसिंगपूर, ता. १७ : उदगाव (ता. शिरोळ) येथील अकराशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री जोगेश्वरी (जोगणी) देवीची यात्रा आज उद्या (ता.१८) पासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती श्री जोगेश्वरी यात्रा कमिटीतर्फे दिली आहे.
गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजता जोगणी यात्रेला सुरूवात होणार असून दिवा काढणी समारंभ होणार आहे. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी सहा वाजता पिसे मिरवणूक, अकरा वाजता अग्नीप्रवेश तर सांयकाळी सात वाजता श्री जोगेश्वरी देवीची मुख्य मिरवणूक आहे. शनिवारी मुकूट मिरवणूक कार्यक्रम सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत होणार आहे. यात्रेनिमित्त गुरुवारी मॅरेथॉन स्पर्धा, हातात धरुन बैल पळवणे व सुट्टा घोडा पळवणे स्पर्धा तर रात्री लाटवडे गिरण येथे अन्न कोट्ट मांगल्य हे कन्नड नाटक तर श्री महादेवी व्यायाम मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी धनंजय महाडिक युवाशक्ती व बिडवे परीवारातर्फे म्हैस व रेडकू पळवणे स्पर्धा, समस्त बौध्द समाजाकडून ऑकेस्ट्रा व लोकनाट्य तमाशा होणार आहे.
शनिवारी सकाळी लोकनाट्य तमाशा व रात्री शिवतेज ग्रुप व शंभो ग्रुपतर्फे लावणी तर सायकांळी निकाली कुस्त्याचे मैदान होणार आहे. सोमवारी श्री राजे शिवछत्रपती तरुण मंडळ बजरंग खामकर ग्रुपतर्फे लावणी महोत्सव तर मंगळवारी श्री राजे शिवछत्रपती तरुण मंडळ सावकार आण्णा प्रेमी ग्रुपतर्फे ऑकेस्ट्रा ठेवला आहे. अनेक मंडळांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बंदोबस्तासाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. यात्रेमुळे पाळणे व खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले आहेत.