जयसिंगपूर पाणी योजनेसाठी ६९ कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूर पाणी योजनेसाठी ६९ कोटी मंजूर
जयसिंगपूर पाणी योजनेसाठी ६९ कोटी मंजूर

जयसिंगपूर पाणी योजनेसाठी ६९ कोटी मंजूर

sakal_logo
By

जयसिंगपूर पाणी योजनेसाठी ६९ कोटी मंजूर
राजेंद्र पाटील-यड्रावकर; नगरोत्थान योजनेतंर्गत प्रशासकीय मान्यता
जयसिंगपूर, ता. १९ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेमध्ये आधुनिकीकरणासह सुधारणा करणे, नवीन फिल्टर हाऊस, पाण्याच्या टाक्या उभारणे, अंतर्गत पाईपलाईनसह मुख्य पाईप लाईन बदलणे यासाठी ६९ कोटी ६६ लाख रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आज (ता.१९) मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयावर मंत्रालयातील प्रधान सचिव नगरविकास यांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. यात हा निर्णय झाला. बैठकीस जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नगरविकासच्या प्रधान सचिव सोनिया शेटी, उपसचिव श्रीकांत अजिंटो, नगरपरिषद प्रशासन आयुक्त किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहरात १५ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारणे, शाहूनगर परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन २ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी, काका ऑइल मिल परिसराला योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी, खामकर मळा व परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी या ५ लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी उभारणे, याचबरोबर १६.०५ एमएलडी क्षमतेचा अत्याधुनिक साधन सामुग्रीने युक्त पाणी शुद्धीकरण प्रकल्प फिल्टर हाऊस उभारणे, शहरातील अंतर्गत डिस्ट्रीब्यूशन पाईप लाईनसह ७० किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकणे या कामांचा समावेश होणार आहे. २०५५ पर्यंतच्या नागरिकांच्या पाणी मागणीचा विचार करून हा अत्याधुनिक पाणी पुरवठा प्रकल्प जयसिंगपूर शहरासाठी मंजूर व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व त्यांच्या सहकाऱ्यांची सातत्यपूर्ण मागणी होती. आपण ही योजना मंजूर व्हावी यासाठी शासन दरबारी आग्रही होतो असेही त्यांनी सांगितले.