Tue, October 3, 2023

मारामारी
मारामारी
Published on : 22 May 2023, 6:49 am
उदगाव येथे दोन गटांत हाणामारी
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उदगाव येथे घडली. सुभाष साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभि विक्रम चिवटे, वैभव विक्रम चिवटे, विक्रम चिवटे (सर्व रा. साखळे मळा, उदगाव), तर लक्ष्मी वैभव चिवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुहास सुभाष साळुंखे, सुभाष साळुंखे, प्रेम साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात सुहास साळुंखे, सुभाष साळुंखे, प्रेम साळुंखे व वैभव चिवटे हे चौघेजण जखमी झाले आहेत.