Sun, October 1, 2023

बोरमाळ चोरी
बोरमाळ चोरी
Published on : 24 May 2023, 6:26 am
कोंडीग्रेत महिलेची बोरमाळ चोरली
जयसिंगपूर: कोंडीग्रे (ता.शिरोळ) येथे शेणी लावत असताना आक्काताई बापू यादव यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ दोन चोरट्यांनी हिसडा मारून नेली. ही घटना बुधवारी (ता.२४) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद आक्काताई यादव यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.