दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हा
दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हा

दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हा

sakal_logo
By

05525
तुर्केवाडी : येथील शिबिरात प्रा. अजय कोंगे यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हा
प्रा. अजय बी. कोंगे; ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन’ शिबीर
जयसिंगपूर, ता. २७ : आपण देशाचे एक सक्षम नागरिक आहोत आणि देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे नवउद्योगाची निर्मिती करून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांनी केले.
कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (तुर्केवाडी, ता. चंदगड), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (भुदरगड, ता. गारगोटी), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (कळंबा, कोल्हापूर ) यांच्यावतीने ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन’  शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये करिअर मार्गदर्शक म्हणून प्रा. कोंगे बोलत होते.
प्रा. कोंगे यांनी दहावी बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजना, अकरावी विज्ञान, आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनिअरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया, महाराष्ट्र राज्य कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती विषयक विविध योजना, रोजगार आणि स्वयंरोजगार, पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज योजना विविध बीजभांडवल महामंडळाची योजना आणि लाभ, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या मार्गदर्शन कार्यक्रमात पावर-पॉइंट प्रेझेंटेशनच्या साह्याने मार्गदर्शन केले.
संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाला भेट देऊन आपल्याला आवश्यक त्या माहितीचे करिअर समुपदेशनाचे मार्गदर्शन विनामूल्य करण्यात येणार आहे. तरी शिबिरापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. कोंगे यांनी केले आहे.