Tue, Sept 26, 2023

न्यायालयीन कोठडी
न्यायालयीन कोठडी
Published on : 30 May 2023, 6:37 am
शाईफेकप्रकरणी ८ जणांना न्यायालयीन कोठडी
जयसिंगपूर : येथील पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सोमवारी शाईफेक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले होते. यात स्वाती विशाल सासणे (वय ३२, रा.उदगांव), सुरज सुकुमार कुरणे (वय ३०, रा.कवठेसार), मनीष बजरंग कांबळे (वय २५, रा.आलास), संतोष राजू कांबळे (वय २३, रा.दानोळी), विश्वजीत पांडुरंग कांबळे (वय ३६, रा.चिपरी), अमित लक्ष्मण वाघवेकर (वय ४१, रा.जयसिंगपूर), सुशांत उत्तम कांबळे (वय २२, रा.कोंडिग्रे), किरण काशीनाथ कांबळे (वय ४५, रा.औरवाड) यांना कुरूंदवाड येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.