Wed, Sept 27, 2023

उपसरपंच, सदस्य अपात्र
उपसरपंच, सदस्य अपात्र
Published on : 3 June 2023, 6:18 am
जैनापूरच्या उपसरपंच भाग्यश्री सुतार अपात्र
जयसिंगपूर: जैनापूर (ता.शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भाग्यश्री अरूण सुतार व ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बाळासो बिरंजे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरविण्यात आले. याबाबतची तक्रार जैनापूर येथील सन्मती रावसो पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याबाबत चौकशी झाल्यानंतर उपसरपंच सुतार व ग्रामपंचायत सदस्य बिरंजे हे अपात्र झाले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिला आहे.