मगदूम अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची निवड

मगदूम अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची निवड

मगदूम अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता.४ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या १९ विद्यार्थ्यांची विविध सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
इंजिनिअरिंग या व्यवसायिक शिक्षणाचा विचार करता विद्यार्थी आणि पालकांसमोर शिक्षणानंतर पहिला पर्याय असतो तो नोकरीचा. त्यासाठी आमच्या महाविद्यालयाने अनेक नामांकित कंपनीशी करार करून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. सायबर सक्सेस पुणे, सी पी एस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, किरण ॲकॅडमी पुणे या कंपन्यांमध्ये १९ विद्यार्थ्यांची निवड झाली. भविष्यात या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स व आयटी विभागाचे आदिती सुरेश पाटील , हर्षवर्धन आनंदराव शिंदे, पूजा यशवंतराव ढवळे, ऋषिकेश प्रकाश पुजारी, सानिया पांडुरंग म्हामुलकर, तेजस अधिकराव शिंदे, ऋतुजा विजय पाटील, अमृत आनंदा कानडे, दिव्याराणी दत्तात्रेय पाटील, सोनीक हनुमंतराव महिंद, ऋषिकेश कृष्णा पाटील, आकांक्षा भरत कुंभार, हर्षल राजगोंडा चांदोबा, ऋतुजा उत्तम पाटील, समृद्धी सुरेश मोहिते, श्रेया अनिल जमदाडे  असे १६ विद्यार्थी आहेत. इ.एन.टी.सी. विभागाची निकिता भरत सुतार व मेकॅनिकल विभागाचे आयुष सुरेश भट व शुभम चंद्रकांत ऐनापुरे यांचीही निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांच्याहस्ते केला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com