‘डॉ. जे. जे. मगदूम’च्या
१९ विद्यार्थ्यांची निवड

‘डॉ. जे. जे. मगदूम’च्या १९ विद्यार्थ्यांची निवड

‘डॉ. जे. जे. मगदूम’च्या
१९ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. २ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या १९ विद्यार्थ्यांची विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये निवड झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी ही माहिती दिली.
कार्यक्षम सॉफ्टवेअर अभियंत्यांना डायनॅमिक क्षेत्रात सामील होण्याची संधी महाविद्यालय उपलब्ध करून देत आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सायबर सक्सेस (पुणे), सीपीएस प्रायव्हेट लिमिटेड (पुणे), किरण अॅकॅडमी (पुणे) या कंपन्यांमध्ये १९ विद्यार्थ्यांची निवड झाली. भविष्यात या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स व आयटी विभागाचे आदिती सुरेश पाटील, हर्षवर्धन आनंदराव शिंदे, पूजा यशवंतराव ढवळे, ऋषीकेश प्रकाश पुजारी, सानिया पांडुरंग म्हामुलकर, तेजस अधिकराव शिंदे, ऋतुजा विजय पाटील, अमृत आनंदा कानडे, दिव्याराणी दत्तात्रेय पाटील, सोनिक हनुमंतराव महिंद, ऋषीकेश कृष्णा पाटील, आकांक्षा भरत कुंभार, हर्षल राजगोंडा चांदोबा, ऋतुजा उत्तम पाटील, समृद्धी सुरेश मोहिते, श्रेया अनिल जमदाडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इ.एन.टी.सी. विभागाची निकिता भरत सुतार व मेकॅनिकल विभागाचे आयुष सुरेश भट व शुभम चंद्रकांत ऐनापुरे यांचीही निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला. शंभर टक्के प्लेसमेंटचे ध्येय समोर ठेवून सतत काम करीत राहा, असे प्रोत्साहन त्यांनी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com