कळेतील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत जयदीप पाटील भैरवनाथ किताबचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळेतील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत जयदीप पाटील  भैरवनाथ किताबचा मानकरी
कळेतील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत जयदीप पाटील भैरवनाथ किताबचा मानकरी

कळेतील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत जयदीप पाटील भैरवनाथ किताबचा मानकरी

sakal_logo
By

02493
कळे: येथील भैरवनाथ तालीम मंडळ आयोजित राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत गंगावेश तालमीचा पैलवान जयदीप राजेंद्र पाटील याने भैरवनाथ किताब पटकावला.

जयदीप पाटील भैरवनाथ किताबाचा मानकरी
कळेत भैरवनाथ तालीम मंडळातर्फे राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा

कळे, ता.६: येथील राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात गंगावेश तालमीचा पैलवान जयदीप पाटील, तर पन्नास किलो गटात आदिनाथ पाटील (रा.पुनाळ) हे भैरवनाथ किताबचे मानकरी ठरले. त्यांना चांदीची गदा व अनुक्रमे रोख रक्कम एकवीस हजार व पाच हजार रुपये देऊन गौरविले. भैरवनाथ तालीम मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम लढतीत खुल्या गटात जयदीप पाटील याने सुनील खताळ (सोलापूर) याला आठ विरुद्ध दोन तर पन्नास किलो गटात आदिनाथ पाटील याने सचिन चौगले (पुनाळ) याला दहा विरुद्ध शून्य अशा गुणफरकाने हरविले.
जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे बाबासाहेब शिरगावकर, तानाजी पाटील, प्रा. सिकंदर कांबळे, संदीप पाटील, विलास पाटील, महेश जाधव, राजाराम पाटील, सतीश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशवंत पाटील-दोनवडेकर यांनी निवेदन केले. अध्यक्ष रामचंद्र इंजुळकर, उपाध्यक्ष रामचंद्र खांबे यांच्यासह तालमीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

निकाल असा: २२किलो: आर्यन शरद पाटील (माणिक कुस्ती संकुल;कळे), विहान शशिकांत सूर्यवंशी (निवाचीवाडी), कार्तिक संतोष डवंग (कळे). २५किलो: अनिकेत सागर चौगले (हरपवडे), रितेश रणजित यादव (उचगाव), रोहन किरण शिपेकर (पुशिरे). ३०किलो: शिवानंद सात्ताप्पा मगदूम (सिद्धनेर्ली), नयन भरत वरुटे, प्रतीक भरत वरुटे (कळे). ३५किलो: राज रायसिंग चौगले (हरपवडे), पृथ्वीराज नंदकुमार पाटील (कळे), पार्थ विलास चौगले (हरपवडे). ४०किलो: कृष्णराज रावसाहेब इंगवले (पाडळी खुर्द), प्रथमेश सूर्यकांत पाटील (बानगे), आदित्य दिलीप जाधव(नरतवडे). ४५किलो: सोहम सुनील कुंभार (शाहू साखर), प्रणव सुधीर घारे (तिटवे), आदर्श अनिल कांबळे (शिरोली दु।।). ५०किलो: आदिनाथ आनंदा पाटील, सचिन आनंदा चौगले (पुनाळ), प्रतीक बाबूराव तोडकर (वाकरे). ५५किलो: आयर्न सुनील पाटील (बेले), ऋषिकेश रघुनाथ आरडे (आरडेवाडी), सतीश जोतिराम कुंभार (आणुर). ६०किलो: अतुल भीमराव चेचर (पोर्ले तर्फ ठाणे), मृणाल मारुती पाटील (राशिवडे), अनिकेत विलास पाटील (आमशी). ६६किलो: कुलदीप बापूसाहेब पाटील (राशिवडे), विनायक प्रकाश मोळे (घरपण), संतोष संजय हिरुगडे (बानगे). ७०किलो: सौरभ अशोक पाटील (राशिवडे बु।।), नीलेश आब्बास हिरुगडे (बानगे), ओंकार एकनाथ पाटील (खाटांगळे). ७६किलो: स्वप्नील संभाजी पाटील (वाकरे), प्रथमेश बाबासाहेब गुरव (शिराळ खुर्द), क्रांतिकुमार नारायण पाटील (आमशी). ८६किलो: भगतसिंग सूर्यकांत खोत (माळवाडी), अमोल नवनाथ कोंडेकर (कुडित्रे), भरत राजाराम पाटील (कोपार्डे). खुला गट: जयदीप राजेंद्र पाटील (गंगावेश), सुनील नागनाथ खताळ (राष्ट्रकुल, सोलापूर), अनिरुद्ध पंडित पाटील (आमशी).

महिला कुस्ती: ५०किलो: सिद्धी राजाराम सावंत (नरतवडे), श्रुतिका शिवाजी पाटील (पाचगाव), कस्तुरी सागर कदम (शिरोली दु।।). ५५किलो: समृद्धी संदीप पाटील (कोतोली), रोहिणी वीरकर (दोनवडे), सुहानी दिलीप देसाई (भामटे).

Web Title: Todays Latest Marathi News Kae22b01778 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top