
कळे: वेतवडे येथील वृध्दाच्या खून प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडी
02501
२५०२
वृद्धाच्या खूनप्रकरणी
वेतवडेतील तिघांना कोठडी
शेतातील हद्दीचा वाद; मारहाणीत झाला होता मृत्यू
कळे, ता. ११ : वेतवडे (ता. गगनबावडा) येथील वृद्धाच्या खून प्रकरणातील संशयितांना न्यायाधीश श्रीमती पन्हाळेकर यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शेतातील हद्दीवरून दत्तू शिंदे व पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबीयांत दोन वर्षांपूर्वी वाद झाला होता. स्थानिक पातळीवर तो मिटविला असला तरी दोन्ही कुटुंबांत धुसफूस सुरू होती. दरम्यान, मंगळवारी (ता. ३) दत्तू लक्ष्मण शिंदे (वय ८४) दुपारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विश्रांतीसाठी गेले होते. तिथे ते झोपले असता सव्वातीनच्या सुमारास पांडुरंग शिंदे व मुले कृष्णात व विश्वास यांनी दत्तू शिंदे यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले होते. गणेश अशोक शिंदे (वय २३) यांनी बुधवारी (ता. ४) कृष्णात पांडुरंग शिंदे, विश्वास पांडुरंग शिंदे, पांडुरंग मानकु शिंदे (सर्व वेतवडे, ता. गगनबावडा) यांच्याविरोधात गगनबावडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील जखमी दत्तू शिंदे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी (ता. ९) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांवर वृद्धाचा खून केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश श्रीमती पन्हाळेकर यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kae22b01781 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..