कळे: विठ्ठल पाटील विद्यालयात वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: विठ्ठल पाटील विद्यालयात  वाचन प्रेरणा दिन
कळे: विठ्ठल पाटील विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

कळे: विठ्ठल पाटील विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय
कळे : श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ; पणुत्रे संचलित, विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कळे प्रशालेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून विविध उपक्रमांनी करून अभिवादन केले. प्राचार्या डॉ. प्रमिला भोसले म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली की त्याची गोडी लागते. पुस्तके वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा देत राहतात.’ डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्यावर साहित्यावर चर्चा केली. एस. डी. भांदिगरे यांनी प्रास्ताविकातून वाचनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी निवडक पुस्तकांचे परीक्षण व समीक्षण करून मते मांडली. विद्यार्थ्यांनी गावात वृत्तपत्रे विकली. सौ. ए. आर. कुंभार यांनी सूत्रसंचालन, के. बी. पाटील, सौ. एस. एन. नांदवडेकर यांनी आभार मानले. सौ. एम. एस. पाटील, ए. ए. पवार, एस. यू. माळी, एस. एन. नांदवडेकर, ए. एस. भोसले, आर. व्ही. पाटील, एस. ए. पाटील, एस. आर. सुतार, बी. एस. पाटील, एन. एस. शेंडगे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.