कळे: देवस्थान समितीच्या जमिनीवरील अतिक्रमण जीसीबीने जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: देवस्थान समितीच्या जमिनीवरील अतिक्रमण जीसीबीने जमीनदोस्त
कळे: देवस्थान समितीच्या जमिनीवरील अतिक्रमण जीसीबीने जमीनदोस्त

कळे: देवस्थान समितीच्या जमिनीवरील अतिक्रमण जीसीबीने जमीनदोस्त

sakal_logo
By

02784
कळे: देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमित गाळे जमीनदोस्त केले.


कळेतील देवस्थान समितीच्या
जमिनीवरील अतिक्रमण काढले

तहसीलदार शेंडगे, समितीचे सचिव नाईकवाडे यांची कार्यवाही

कळे, ता.३ : देवस्थान समितीच्या जमिनीवरील अतिक्रमण जेसीबीने जमीनदोस्त केले, तर काही गाळे सील केले. तहसीलदार रमेश शेंडगे व देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. 
येथील श्री धर्मराज देव देवस्थान मिळकत गट क्रमांक २५३ मध्ये कळे-बाजार भोगाव मार्गालगत मुख्य बाजारपेठेत अकरा गुंठे जमीन आहे. सुभाष मोळे (कळे) यांचीही लगत गट क्रमांक २४९ मध्ये जमीन क्षेत्र आहे. दरम्यान, मोळे यांनी काही वर्षांपूर्वी देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून दुकानगाळे काढले. त्यामुळे त्यांचा व देवस्थानची जमीन कसणाऱ्या उज्ज्वला विश्वास पाटील (कळे) यांच्यात दावा सुरू होता. दरम्यान, न्यायालयातर्फे झालेल्या मोजणीत अतिक्रमण सिद्ध झाले होते. दरम्यान, बापू राऊ पाटील (आकुर्डे, ता. पन्हाळा) यांनी देवस्थान जमिनीलगत गट क्रमांक २५२ हे क्षेत्र व्यवसायासाठी खरेदी केले होते. त्यांनी २०१९ मध्ये देवस्थानच्या जागेतून वहिवाटीचा रस्ता भुईभाड्याने मिळवला होता. याविरोधात उज्‍ज्वला पाटील यांनी दावा दाखल केला होता. जिल्हा न्यायालयात २४ ऑगस्ट २०२२ ला बापू राऊ पाटील यांच्या बाजूने निकाल लागला. बांधलेल्या इमारतीत त्यांची सुनील व अजित ही दोन मुले सोनार व्यवसाय करत होती. भुईभाड्याने दिलेल्या जागेत सुभाष मोळे यांनी अतिक्रमण करून बापू पाटील यांची येण्या-जाण्याची वाट बंद केली. याबाबत बापू पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कळे पोलिस ठाण्यात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागितली होती.
दरम्यान, स्वतःच्या जागेत बांधकाम असल्याचा दावा सुभाष मोळे यांनी केला होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १३ डिसेंबर २०२१ व ९ फेब्रुवारी २०२२ ला कळविले होते. त्यानुसार पन्हाळा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण निष्कसित करण्याचा आदेश पारित केला. दोन ऑक्टोबरपूर्वी अतिक्रमण काढून घेण्यासाठी सुभाष मोळे यांच्यासह बारा गाळेधारकांना पन्हाळा तहसील कार्यालयाने नोटीस बजावली होती. तत्पूर्वी दुकान गाळे खाली झाले नव्हते. दुकान गाळे सील झाल्यास साहित्य अडकून पडेल म्हणून तहसीलदार शेंडगे व देवस्थान समितीचे सचिव नाईकवाडे यांनी सर्व गाळेधारकांना साहित्य बाहेर घेण्यासाठी आवाहन केले. गाळेधारकांनी आपापले साहित्य बाहेर घेतले. गाळे रिकामे होताच कुलूप लावून शासकीय सीलबंद केले. तसेच बापू पाटील यांच्या दुकानासमोरील चार गाळे जेसीबीने जमीनदोस्त केले. मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे, तलाठी संदीप कांबळे, देवस्थानचे मिलिंद घेवारी, सुयश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे आदी उपस्थित होते.