कळे: मरळी येथे परसबागेत गवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: मरळी येथे परसबागेत गवा
कळे: मरळी येथे परसबागेत गवा

कळे: मरळी येथे परसबागेत गवा

sakal_logo
By

कळेतील गव्यांचा कळप.
02821
....

मरळीत गव्याकडून मांडव उद्‌ध्वस्त

कळे : मरळी (ता. पन्हाळा) येथे संभाजी बंडा चौगले यांच्या परसबागेत शुक्रवारी सकाळी गवा आला. तेथील भाजीपाल्याचा मांडव त्याने उद्‌ध्वस्त केला. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गवा पुढे पूर्वेला चिंचवडेच्या हद्दीत गेला. दरम्यान, कळेतील नऊ गव्यांचा कळप तामजाई पठाराकडे वन विभागाच्या हद्दीत हुसकावून लावण्याचे प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
....
फोटो
03304
भादवणवाडी ः कार्यकर्त्यांचा सत्कार करताना आमदार हसन मुश्रीफ. सोबत वसंतराव धुरे, शिरीष देसाई, दीपक देसाई, विजयराव वांगणेकर, मारुतराव घोरपडे.
....

भादवणवाडीत भाजप कार्यकर्त्यांचा
मुश्रीफ गटात प्रवेश
उत्तूर ः भादवणवाडी (ता. आजरा) येथील भाजपचे गटनेते महादेव दिवेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत आमदार हसन मुश्रीफ गटात प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेश सिमणे, बापूराव अनावरे, दीपक सिमणे, बबन अनावरे, अशोक कुंभार, दिनकर पाटील यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आलेल्या या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन. गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गट-तट, पक्ष असा भेदाभेद न मानता काम करीत राहिलो. त्यामुळेच जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले.’ यावेळी माजी सभापती वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरीष देसाई, विजयराव वांगणेकर, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई, कृष्णा परीट, बळवंत सिमणे आदी उपस्थित होते.
....
फोटो ओळ-
03040
कबनूर ः येथील मारुती मंदिर व परिसरात शिवप्रतिष्ठानच्यावतीने दीपोत्सव करताना भाविक.
....
कबनूरमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने दीपोत्सव
कबनूर ः येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मारुती मंदिर व परिसरामध्ये २१०० दिवे लावून देव दीपावली साजरी करण्यात आली. गावातील पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार कमिटीच्यावतीने करण्यात आला आहे. सैनिक किरण थोरात यांचे वडील सखाराम थोरात व आई रत्नाबाई थोरात तसेच माजी सैनिक अभिजित पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. अनिल साळुंखे यांनी स्वागत केले. मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद पाटील व उपसरपंच सुधीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच शोभा पोवार, बी. डी. पाटील, बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, भैय्या जाधव, सुधीर लिगाडे, अर्चना पाटील, वैशाली कदम, रजनी गुरव उपस्थित होते. गणेश सुतार यांनी आभार मानले.
.....

कोडोलीत आज व्यापाऱ्यांचा बंद
कोडोली : येथील गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्याबाबत कोडोली ग्रामपंचायतीमार्फत बजावण्यात आलेल्या नोटिशीमुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून कोडोली व्यापारी असोसिएशन शनिवारी (ता. २६) दुकाने बंद ठेवून पाठिंबा देणार आहेत. नागरिकांच्या वतीने पन्हाळा तहसीलदार यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. त्यापूर्वी कोडोली येथील दत्त मंदिरमध्ये सर्व मिळकतधारक एकत्र जमले होते. यावेळी कोडोली व्यापारी असोसिएशनच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले. तसेच शनिवारी सर्व दुकाने बंद ठेवणार असल्याचे अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा यांनी जाहीर केले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे संजय बजागे, संदीप पोतदार, दादा मुदगल, मोती उबारे, अमर पाटील, शशिकांत खामकर आदी उपस्थित होते.