कळे: बनावट नोटा प्रकरणातील संशयितांना कोल्हापुरात फिरवले. संशयितांच्या घराचीही झडती घेतली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: बनावट नोटा प्रकरणातील संशयितांना कोल्हापुरात फिरवले. संशयितांच्या घराचीही झडती घेतली.
कळे: बनावट नोटा प्रकरणातील संशयितांना कोल्हापुरात फिरवले. संशयितांच्या घराचीही झडती घेतली.

कळे: बनावट नोटा प्रकरणातील संशयितांना कोल्हापुरात फिरवले. संशयितांच्या घराचीही झडती घेतली.

sakal_logo
By

बनावट नोटाप्रकरणी संशयितांच्या घराची झडती

पोलिसांनी चौकशीसाठी कोल्हापुरात फिरवले

कळे, ता. २३ : बनावट नोटा प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी कोल्हापुरात फिरवले. नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य कोल्हापुरातील वेगवेगळ्या दुकानातून संशयितांनी खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यानुसार संशयितांनी दाखवलेल्या इलेक्ट्रॉनिक व रबरी शिक्के तयार करणाऱ्या दोन दुकानांमध्ये चौकशी केली. दरम्यान, पोलिसांनी संशयितांच्या घराचीही झडती घेतली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणारी टोळी पकडली होती. संशयित चंद्रशेखर पाटील (कसबा तारळे), अभिजित पवार (गडमुडशिंगी), दिग्वीजय पाटील (शिरोली पुलाची) व संदीप कांबळे (कळे) यांच्यावर गुन्हा दाखल करून बनावट नोटांसह बारा लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य कोल्हापुरातील वेगवेगळ्या दुकानातून संशयितांनी खरेदी केल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले.
संशयितांनी कबूल केल्याप्रमाणे कोल्हापूर येथील दुकानांमध्ये त्यांना नेले. शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत असलेल्या संगणक, प्रिंटर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्याकडे चौकशी केली. या दुकानातून संशयित कांबळे याने एप्रिलमध्ये प्रिंटर खरेदी केला होता. दुकानदाराने खरेदीची पावती पोलिसांना दिली. त्यानंतर आरोपींना महाद्वार मार्गावरील राजोपाध्ये बोळ येथील एका रबर स्टॅम्प तयार करणाऱ्या दुकानात पोलिस घेऊन गेले. या ठिकाणी कांबळेने रबरी शिक्के तयार केले होते. तेथील बिलाच्या पावत्या ताब्यात घेतल्या. कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती , हवालदार संदीप पाटील, सहायक फौजदार नामदेव चौगले यांच्या पथकाने तपास केला.
दरम्यान, संशयित चार आरोपींपैकी कळे व गडमुडशिंगी येथील दोघांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. आरोपी अभिजित पवार याच्या गडमुडशिंगी येथील राहत्या घराची झडती घेतली. तसेच कळेतील संशयित कांबळे याच्या घराची सपोनि प्रमोद सुर्वे यांनी सायंकाळी पाहणी केली. दोन्ही ठिकाणी पोलिसांना काहीच हाती लागले नाही.