कळे: वैरणीला गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे:  वैरणीला गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात जखमी
कळे: वैरणीला गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात जखमी

कळे: वैरणीला गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात जखमी

sakal_logo
By

कळे येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्धा जखमी

कळे, ता.३०: येथे वैरणीला गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात जखमी झाली. हारुबाई श्रीपती डवंग (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील कळे येथील मरळी पुलानजीक कुंभी नदीशेजारी डवंग यांची शेती आहे. येथे जनावरांसाठी त्यांनी वैरण केली आहे. वैरण कापण्यासाठी हारुबाई डवंग यांना त्यांचा मुलगा संतोष याने गाडीवरून आणून सोडले व तो जनावरांचे दूध काढण्यासाठी घरी गेला. दरम्यान, हारुबाई या गवत कापू लागल्या असता पाठीमागून गवा आला. चाहूल लागण्यापूर्वीच गव्याने त्यांना शिंगाने ढकलले. तो गवा असल्याचे हारुबाई यांच्या उशीरा लक्षात आले. बरगडीला मुक्का मार लागला असल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. दरम्यान, तिथेच शेजारील शेतीत असलेले हंबीरराव पाटील यांनी हारुबाई यांना गाडीवरून घरी आणून सोडले. दरम्यान, परिसरात गवा फिरत असल्याचे वनविभागाला आधीच समजले होते. त्यानुसार वनरक्षक बाजीराव देसाई काही लोकांच्या मदतीने गव्याच्या शोधात होते. दरम्यान, वृद्धेला जखमी केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान, गवा नदीपात्र ओलांडून पलीकडे मोरेवाडी परिसरातून जाधववाडी येथील डोंगरात गेल्याची माहिती वनविभागाने दिली. जखमी हारुबाई यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
...