
कसबा बीड ला साकारतयं भव्य क्रिडांगण
01802
बीडशेड ः येथील क्रीडांगणाच्या भिंत उभारणीचा प्रारंभ करताना रवींद्र पाटील. शेजारी राजेंद्र सूर्यवंशी, सत्यजित पाटील, प्रताप पाटील, सर्जेराव सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, सरपंच दिनकर गावडे, उपसरपंच श्रीनिवास पाटील, तुकाराम पाटील आदी.
कसबा बीडमध्ये
साकारतेय भव्य क्रीडांगण
कामाचा प्रारंभ; तलावातील गाळ काढण्याचेही काम
कसबा बीड ता. ३ : येथील बीडशेड परिसरात अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला प्राचीन गणेश तलावाचे रूपडे पालटू लागले आहे. पंचायत समिती सदस्य व माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून व लोक सहभागातून गणेश तलाव जीर्णोद्धार व क्रीडांगण साकारले जात आहे. तलावात असणारा १० ते १५ फूट गाळ बाहेर काढून तलावाला लागूनच चार एकर जागेवर क्रीडांगण आकार घेत आहे. तर गाळ काढल्यामुळे तळे सुशोभित व गाळमुक्त होणार आहे. चार एकर मैदान, साडेसात एकर तळे, १६०० मीटरचा रनिंग ट्रॅक, सभोवताली वृक्षारोपण, सांडपाणी नसलेले एकमेव तळे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्क, पुरातन वस्तू संग्रहालय असा तळ्याचा नियोजित आराखडा आहे.
तळ्यासाठी अंदाजे ५० लाखांचा निधी लागणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ८ लाख निधी मिळाला आहे. दोन डोझर गेली महिनाभर विनामूल्य दिले आहेत. गट-तट बाजूला ठेवून गावातील तरुणांना घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती.
कसबा बीड ग्रामस्थांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. भावी पिढी सुदृढ व्हावी, या उद्देशाने तयार होणाऱ्या मैदानासाठी अवजड मशिनरी विनामूल्य देत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तळ्यातील गाळाचे आपोआप विघटन होऊन गाळ पुन्हा साठून राहणार नाही. याची दक्षता घेतली पाहिजे.
- रवींद्र आर. पाटील, अध्यक्ष, जिल्हा अर्थमुव्हिंग असोसिएशन.
Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01130 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..