टुडे ३ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३ स पटा
टुडे ३ स पटा

टुडे ३ स पटा

sakal_logo
By

भोगावती कारखान्यासमोर
वाहतूक संघटनेतर्फे आंदोलन
राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोर ऊस-तोडणी वाहतूक संघटनेतर्फे आजपासून साखळी आंदोलन सुरू केले. थकीत बिले द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष आर.वाय.पाटील यांनी दिला. याबाबत त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ६५० वाहने बिगर ॲडव्हान्स कार्यरत आहेत. या वाहनधारकांचे तीन महिन्याची बिले दिली नाहीत. बिलाची अंदाजे रक्कम सहा कोटीच्या घरात असून यावरचे कमिशन बिल ४५ टक्केआहे. उपाध्यक्ष तानाजी जाधव, राजेंद्र पाटील, धनाजी कौलवकर, शशिकांत पाटील, दशरथ पाटील, प्रदीप पाटील, बाजीराव कुपले, कृष्णा धनवडे यांच्‍यासह वाहनधारक ऊस तोड कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबाबत कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी ''अखेरच्या टप्पातील शेतकऱ्यांच्या उसाची व तोडणी ओढणीची बिलेही देय आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच ती दिली जातील असे सांगितले.

02764
नरतवडे ः येथे नागरिकांना कचरा कुंडीचे वाटप करताना ग्रामपंचायत पदाधिकारी,उपस्थित ग्रामस्थ.

नरतवडेत कचरा कुंड्यांचे वाटप
सरवडे ः नरतवडे,(ता.राधानगरी) येथील नागरिकांना स्वच्छ भारत मिशनसाठी १५ व्या वित्त आयोग निधीतून गावातील सर्व कुटूंबांना कचरा कुंडी वाटप तसेच अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य वाटप केले. अध्यक्षस्थानी सरपंच सुजाता मुसळे होत्या. यावेळी उपसरपंच सहदेव कांबळे, सदस्य बाबुराव गुरव, विलास सावंत, सुजाता पाटील, वंदना शिंदे, श्रध्दा पाटील, सुरेखा कुंभार, धनश्री एरुडकर, तलाठी आर.एम.पाटील आदी उपस्थित होते. ए.एसठोंबरे यांनी स्वागत केले. दीपक चौगले यांनी आभार मानले.

01814
01815
अध्यक्षपदी प्रकाश पाटील
कसबा बीड ः कोगे (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. पहिली सभा निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अध्यक्षपदी ‘कुंभी‘चे संचालक प्रकाश कुंडलीक पाटील यांची तर उपाध्यक्षपदी कृष्णात ईश्वरा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. २००४ पासून संस्था व सभासद यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे २० वर्षे माझी बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. नूतन संचालक अभिजीत कोतमिरे, रघुनाथ पाटील, प्रकाश घराळ, रंगराव मेढे, आकाराम चव्हाण, शिवाजी डाफळे, दशरथ पाटील, आनंदा पाटील, मारूती मांगोरे, कृष्णात उत्रेकर, बाळासो पाटील, कृष्णात कांबळे, राजू मुल्लाणी, मंगल पाटील, सरिता यादव उपस्थित होते. आभार सचिव के.एल.जाधव आदी उपस्थित होते.

01474
दिंडेवाडी ः येथे माजी सभापती धोंडीराम वारके यांचा सत्कार करताना के.पी.पाटील.

दिंडेवाडीत किर्तन सोहळ्याची सांगता
पिंपळगाव ः धोंडीराम वारके यांचे सामाजिक कार्य गौरवास्पद आहे, धोंडीराम वारके यांचे चिकोत्रा खोऱ्यातील सामाजीक काम अविरतपणे सुरु आहे.
खेड्यातल्या प्रत्येक घटकांच्या आत्मियतेने संपर्कात राहून समाजकार्य करण्याची त्यांची तळमळ प्रेरणादाई आहे, असे गौरोद्गार माजी आमदार के.पी.पाटील यांनी व्यक्त केले. दिंडेवाडी (ता.भूदरगड) येथील किर्तन सोहळ्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते. किर्तनकार सागर बोराटे यांचे किर्तन झाले.
धोंडीराम वारके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्य किर्तन आयोजित केले होते. यावेळी जगदिश पाटील,विश्वनाथ कुंभार,अशोक पाटील, अशोक साळोखे, अरुण बेलेकर, रमेश गायकवाड, अशोक इंदुलकर, रमेश आमणगी, सुरेश इंदुलकर, दयानंद ऱ्हाटवळ , दिपक वारके, संजय भरिष्टे यांचेसह भजनप्रेमी उपस्थित होते.प्रा.डॉ. शहाजी वारके यांनी आभार मानले.

कोतोलीत ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन
पुनाळ : कोतोली (ता.पन्हाळा) श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी येथे ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन झाले. येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधन समिती, इतिहास विभाग व सांस्कृतिक विभागातर्फे प्रकाशन सोहळा झाला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील होते. प्रास्ताविक श्रीमती उमा पाटील यांनी केले. पी.डी.माने यांनी स्वागत केले. डॉ.बी.एस.शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.उमा पाटील लिखित पन्हाळा तालुक्याचे ऐतिहासिक योगदान या ग्रंथाच्या प्रकाशन डॉ.जे.के.पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी संस्था सचिव शिवाजी पाटील, प्र. प्राचार्य डॉ.व्ही. पी. पाटील, डॉ. बी.एन.रावण, डॉ.उषा पवार, ए.आर.महाजन,एस.एस.कांबळे आदी उपस्थित होते. डॉ.श्रीमती एम.एच.पाटील यांनी आभार मानले.


02294
गारगोटी : स्टेट बँक शाखेतर्फे अपघातग्रस्तांच्या वारसांना विम्याचे दहा लाख रूपये खात्यावर जमा केल्याचे पत्र देताना शाखाधिकारी विजय पवार व नागेश पाटील.

अपघातग्रस्ताच्या वारसांना विमा रक्कम
गारगोटी : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतर्फे अपघातग्रस्ताच्या वारसांना अपघाती विमा संरक्षण म्हणून १० लाखांची मदत मिळवून देण्यात आली. पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील विजय माडेकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांनी येथील स्टेट बँकेच्या शाखेत अपघाती विमा काढला होता. येथील शाखेतर्फे कागदपत्रांचा पाठपुरावा करून सदरची रक्कम वारसांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती शाखाधिकारी विजय पवार यांनी दिली. यावेळी असोसिएट सुशांत गुरव, नागेश पाटील, रमेश गुरव आदी उपस्थित होते. स्टेट बँकेच्या विविध विमा योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाखाधिकारी विजय पवार यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01141 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top