बीडशेड येथे दिवसाढवळ्या चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीडशेड येथे दिवसाढवळ्या चोरी
बीडशेड येथे दिवसाढवळ्या चोरी

बीडशेड येथे दिवसाढवळ्या चोरी

sakal_logo
By

वारकऱ्याच्या घरातून
पळविले चार तोळे दागिने
बीडशेडमध्ये प्रकार; माहीतगाराचे कृत्य

कसबा बीड, ता. ५ ः बीडशेड (ता. करवीर) येथील गणेशवाडी रोडवरील ओमकार बेकरीमध्ये भरदिवसा चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चार तोळे सोन्याचे दागिने पळविले. सोमवारी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान ही घटना घडली. सदर घटनेची नोंद करवीर ठाण्यात झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बीडशेड (ता. करवीर) येथे सुनील जोतीराम दिंडे यांच्या स्वमालकीचे बेकरीचे दुकान आहे. कुटुंबासह ते वरील मजल्यावर राहतात. आषाढी वारीसाठी पंढरपूर दर्शनासाठी सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून घरातील सर्व मंडळी बाहेर पडले. ते आज दुपारी १२ वाजता पंढरपूरहून परतले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बाहेर ठेवलेल्या चावीच्या आधाराने कुलूप काढून दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली; पण चांदीचे दागिने चोरले नाहीत. पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले; पण ठराविक अंतरावर पावसामुळे श्वान घुटमळले. चोरटा माहितीतील असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सरवडेकर करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kbb22b01174 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..