पांडुरंग सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंग सेवा संस्थेची 
सर्वसाधारण सभा
पांडुरंग सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा

पांडुरंग सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा

sakal_logo
By

पांडुरंग सेवा संस्थेची
सर्वसाधारण सभा
कसबा बीड, ता. २४ ः येथील पांडुरंग विकास सेवा संस्थेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष अमित वरूटे होते. प्रतिमा पुजन उपाध्यक्ष प्रकाश कुंभार व ‘कुंभी’चे संचालक उत्तमराव वरूटे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे शेअर्स भांडवल ८४ लाख ५० हजार असून सभासद ठेव ५३ लाख ७५ हजार आहे. चालू वर्षी सभासदांना डिव्हिडंड व ठेव व्याज नऊ टक्केने सहा लाख सोळा हजाराचे वाटप करण्यात आले. या वेळी संचालक चंद्रकांत वरूटे, मारूती वरूटे, सचिन पानारी, आकाराम गावडे, रघुनाथ मालप, उद्धव चव्हाण, मारूती मिसाळ, शामराव सुर्यवंशी, सुमित पाटील, विलास कांबळे, दिनकर गिरी, शांताबाई जोगडे, गिता बीडकर, सदाशिव खांडेकर, धनाजी वरूटे यांच्या सह माजी सरपंच शिवाजी वरुटे, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, बापुसाहेब पोर्लेकर, आनंदा पाटील, सुरेंद्र वरुटे, कृष्णात हावलदार, उदय वरुटे, बबन वरुटे, सभासद उपस्थित होते.