.कोगे येथे भाताची मळणी करताना हात यंत्रात सापडून हात तुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

.कोगे येथे भाताची मळणी करताना हात यंत्रात सापडून हात तुटला
.कोगे येथे भाताची मळणी करताना हात यंत्रात सापडून हात तुटला

.कोगे येथे भाताची मळणी करताना हात यंत्रात सापडून हात तुटला

sakal_logo
By

मळणी यंत्रात
सापडून हात निकामी

कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथे भात मळणी करताना यंत्रात हात सापडून एकाचा हात तुटून निकामी झाला. परशराम गंगाराम पाटील (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सकाळी साडेबाराच्या सुमारास घडली. येथील ‘ढेंग्याचा माळ’ शेतात परशराम पाटील भात मळणीसाठी गेले होते. मळणी करताना मशिन यंत्रात अडकलेल्या भाताच्या काड्या काढताना पाटील यांचा उजवा हात यंत्रात सापडला. क्षणार्धात हाताचा खालील भाग मनगटापासून तुटून पडला. जोरदार रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.